MVA Seat Formula ; विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर! हा असेल फॉर्म्युला

MVA Seat Formula ; विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर! हा असेल फॉर्म्युला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे चर्चा झाल्यानंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
Published by :
shweta walge
Published on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे चर्चा झाल्यानंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत मविआने जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार मविआत कोणीही मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असणार नाही. तर तीन्ही प्रमुख घटक पक्ष हे एकसमान असणार आहेत. 85-85-85 असा हा फॉर्म्युला असणार आहे. म्हणजेच या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना समसमान जागांचं वाटप करण्यात आलं आहे. तसंच उर्वरित जागा या छोट्या मित्र पक्षांना देण्यात येणार आहेत.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 85-85-85 हा फॉर्म्युला जाहीर केला. या फॉर्म्युल्यानुसार एकूण 255 जागा होतात, तर 33 जागा उरतात. या उरलेल्या जागांपैकी 10 जागा या छोट्या मित्र पक्षांना देण्यात येणार आहेत. त्यानंतरही राहिलेल्या 23 जागांवर अद्यापही मविआत तिढा कायम आहे. या जागांवर पुन्हा मविआतील नेत्यांची बैठक पार पडणार असून यानंतर त्या जागा जाहीर केल्या जाणार अशी माहिती राऊतांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com