मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची तिहार जेलमधून सुटका
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची तिहार जेलमधून सुटका करण्यात आली आहे. NSE फोन टॅपिंग प्रकरणी संजय पांडेंना जुलैमध्ये अटक झाल्यानंतर त्यांनी जवळपास पाच महिने तुरुंगात काढले.NSE कर्मचाऱ्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाशी निगडीत मनी लॉड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. जुलैमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली होती. 2009 ते 2017 या काळात पांडेंनी बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे.
संजय पांडे यांच्या कंपनीने जवळपास आठ वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला (CBI) मिळाली होती. संजय पांडे यांच्या iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून हे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीने केला होता.
दिल्ली उच्च न्यायालयाने 8 डिसेंबर रोजी पांडेंना जामीन मंजूर केला होता. संजय पांडे 30 जून 2022 रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. निवृत्तीनंतर अटक होणारे संजय पांडे हे तिसरे मुंबई पोलीस आयुक्त आहेत.