काॅरिडाॅरला विरोध करण्यासाठी माजी खासदार  सुब्रमण्यम स्वामी 24 डिसेंबरला पंढरपूरला येणार

काॅरिडाॅरला विरोध करण्यासाठी माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी 24 डिसेंबरला पंढरपूरला येणार

पंढरपूर येथील प्रस्तावित कॉरिडाॅरला‌ विरोध करण्यासाठी माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी येत्या 24 डिसेंबरला पंढरपूर दौर्यावर येणार आहेत
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अभिराज उबाळे, पंढरपूर

पंढरपूर येथील प्रस्तावित कॉरिडाॅरला‌ विरोध करण्यासाठी माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी येत्या 24 डिसेंबरला पंढरपूर दौर्यावर येणार आहेत अशी‌ माहिती अॅड.मनोहर शेट्टी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. विठ्ठल दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या सोयीसाठी राज्य सरकारने विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात विकास आराखडा तयार केला आहे. दरम्यान या विकास आराखड्याला मंदिर परिसरातील काही व्यापारी व नागरिकांनी विरोध केला आहे.

व्यापाऱ्यांनी सुब्रमण्यम स्वामी यांची भेट घेऊन विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी पंढरपूर येणार आहेत. येथील व्यापारी आणि नागरिकांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. सुब्रमण्यम स्वामी यांच्या दौर्या आगोदर सुब्रमण्यम स्वामी यांचे शिष्टमंडळ आज पंढरपुरात आले होते. त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून स्थानिक रहिवासांशी संवाद‌ साधला.यावेळी त्यांनी कॅरिडाॅरला विरोध करणार असल्याचे जाहीर केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com