Breaking : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंवर भाषणादरम्यान झाला गोळीबार
जपानचे (Japan) माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर गोळी झाडल्याची बातमी समोर आली.
ते पश्चिम जपानमधील नारा शहरात एका सभेला संबोधित करत होते. भाषणादरम्यान ते अचानक खाली पडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार घटनास्थळी गोळ्यांचा आवाज ऐकू आला आणि शिंजो आबे ((Shinzo Abe) यांच्या शरीरातून रक्त वाहत असल्याचे दिसले. भाषण करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गोळी लागल्यानंतर आबे यांना कार्डियक अरेस्टचाही त्रास झाला. त्यानंतर ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जखम झाली. मेडिकल टीमनं त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवले.
हल्लेखोरांनं त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला होता. जपानी पोलिसांनी संदिग्ध हल्लेखोराला अटक केली आहे.
शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान होते. हल्लेखोर कोण होता? त्यानं आबे यांना गोळी का मारली हे अद्याप समजलेलं नाही. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं.