देशात पहिल्यांदाच बुलेट ट्रेन धावणार समुद्रातून; भुयारी मार्गासाठी मागवल्या निविदा
देशात पहिल्यांदाच बुलेट ट्रेन समुद्रातून धावणार आहे. यासाठी समुद्रात बोगदा उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉरपोरेशन लिमिटेडने यासाठी निविदा मागवल्या आहेत. 21 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. यामधील सात किलोमीटर भुयारी मार्ग समुद्राच्या तळाशी असेल.
हा समुद्री बोगदा 13.1 मीटर व्यासाचा आणि 'सिंगल-ट्यूब ट्विन-ट्रॅक' असेल. या विभागात बोगद्याला लागून असलेल्या 37 ठिकाणी 39 इन्स्ट्रुमेंट रूम बांधण्यात येणार आहेत. सुमारे 16 किमी लांबीचा बोगदा तयार करण्यासाठी तीन टनल बोरिंग मशीन (TBM) वापरण्यात येतील आणि उर्वरित पाच किलोमीटर मार्ग न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड (NATM) मशीनचा उपयोग करुन बांधला जाईल. हा बोगदा जमिनीच्या खाली सुमारे 25 ते 65 मीटर खोल असेल. या बोगद्याचं सर्वात खोल बांधकाम शिळफाटाजवळ असेल. शिळफाटाजवळील पारसिक टेकडीच्या खाली 114 मीटर असेल. अशी माहिती मिळत आहे.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा येथील भूमिगत स्थानकादरम्यान हा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. हा भुयारी मार्ग 7 किलोमीटर लांबीचा असेल. निविदेतील कागदपत्रांनुसार, टनेल बोरिंग मशीन (TBM) आणि 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड' (NTM) वापरून बोगदा बांधण्यात येणार आहे. देशातला समुद्राखालील पहिला भुयारी मार्ग मुंबईत होणार आहे.