ताज्या बातम्या
४५ वर्षांत प्रथमच काँग्रेस कार्यकारिणी पदांसाठी निवडणुका घेणार
४५ वर्षांत प्रथमच काँग्रेस कार्यकारिणी पदांसाठी निवडणुका घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
४५ वर्षांत प्रथमच काँग्रेस कार्यकारिणी पदांसाठी निवडणुका घेणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्री यांनी याबाबत माहिती दिली आहे. राष्ट्रीय कार्यकारणीसाठी शेवटची निवडणूक १९९७ मध्ये कोलकाता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनादरम्यान झाली होती.
मधुसूदन मिस्री यांनी सांगितले की, काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत २३ सदस्य असून त्यापैकी १२ जणांची निवड निवडणुकीद्वारे घेण्यात येते, तर ११ जणांची निवड नामनिर्देशित पद्धतीने होते. जर राष्ट्रीय कार्यकारणीसाठी १२ पेक्षा जास्त अर्ज आले, तर राष्ट्रीय कार्यकारणीसाठी निवडणुका घेण्यात घेईल. यासोबतच यासाठी काँग्रेसचे राज्य निवडणूक अधिकारी सर्व राज्यांना भेट देणार असून सर्व प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. असेही त्यांनी सांगितले.