आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; 108 जणांचा बळी

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; 108 जणांचा बळी

पुराचा 45 लाख नागरिकांना तडाखा
Published on

गुवाहाटी : एकीकडे महाराष्ट्राील सत्ताकेंद्र गुवाहटीत ठाण मांडून बसले असून दुसरीकडे आसामधील पुरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या संकटाचा 45 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना तडाखा बसला असून गेल्या २४ तासांत आणखी सात जणांचा मृत्यू झाला. आता बळींची संख्या १०८ झाली आहे.

आसाममध्ये पूरपरिस्थिती अद्यापही बिकट आहे. ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांचे पाणी शुक्रवारी ओसरत असले तरी त्यांच्या उपनद्या अद्यापही तुडूंब वाहत आहेत, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. या आपत्तीत आतापर्यंत १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या २४ तासांतील सात बळींचा समावेश आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून महामार्ग जलमय झाले आहेत. दरम्यान, आसाम पुरग्रस्तांसाठी युध्दपातळीवर मदत करण्यात येत असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यात येत आहे.

बराक खोऱ्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या सिलचरचा बहुसंख्य भाग हा पाण्याखाली आहे, असे जिल्ह्यातील अधिकाऱ्याने सांगितले. आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) सांगितले की, पूरग्रस्त भागात विशेषत: कछार जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी अधिक जवान पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, आसामच्या पूरपरिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com