हिंगणघाटात धक्कादायक प्रकार! नागा साधूंच्या वेशातील पाच आरोपींना घेतलं ताब्यात, 9 लाख 81 हजाराचा मुद्देमाल जप्त
भूपेश बारंगे | वर्धा: हिंगणघाट येथील एका इसमाकडून उसनवारीचे 50 हजार रुपये घेऊन मुलांसोबत साहेबराव बापूराव झोटींग, वय 55 वर्ष रा. अंजनगाव येथे मोटारसायकलने जात असताना वणा नदीच्या पुलाजवळ आले असता तेवढ्यात अज्ञात नागा साधुनी त्यांना थांबवून, नागा साधू आले आहे. ते गाडीत आहे. अस म्हणत ,तुम्ही नागा साधूंचे दर्शन घ्या, असे म्हणून साहेबराव झोटींगला गाडीजवळ घेऊन जाऊन त्यांच्या पॅन्टच्या खिशात असलेले 50 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून नेत आरोपी पसार झाले. या घटनेची तक्रार हिंगणघाट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. घटना अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने चौकशीकरिता स्थानिक गुन्हे शाखेने स्वतःकडे घेऊन तपास केला.
नागा साधूंना पकडण्यासाठी कोणताही पुरावा नव्हता. तपास करण्यासाठी अत्यंत चिकाटीने कौशल्य दाखवून स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरुवात केली. सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी मारुती सुझुकी, इर्टीगा गाडी निष्पन्न केली. गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, नेर येथे फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच त्याच्या मार्गवर गेले असता, यवतमाळकडून वर्धाकडे चारचाकी वाहनात नागा साधूंच्या वेशात असलेले इसम दिसून येताच स्थानिक गुन्हे शाखेने हुसनापूर टोल नाक्याजवळ नाकेबंदी करून वाहन क्र. जिजे.01आर एक्स 0745 वाहन थांबवून त्यात असलेले आरोपी करणनाथ सुरुमनाथ मदारी(वय 22), कैलासनाथ सुरेशनाथ मदारी (वय 27), गणेशनाथ बाबूनाथ मदारी (वय 18), प्रताभनाथ रघुनाथ मदारी(वय 22), धीरुनाथ सरकारनाथ मदारी (वय 26) सर्व गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या गावातील आरोपी असल्याचे सांगितले.
पाचही आरोपींना पोलीसी हिसका दाखवत विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली देण्यात आली. या गुन्ह्यात 8 लाख 91 हजाराचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक मनोज गभने, उपनिरीक्षक सलाम कुरेषी, संचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकीसन इप्पर, अरविंद इंगोले, अक्षय राऊत, प्रशांत ठोंबरे, राहुल साठे, अमोल तिजारे यांनी कारवाई केली.