ताज्या बातम्या
Odisha Train Accident: ओडिशा दुर्घटनेनंतर 51 तासांनंतर पहिली ट्रेन रवाना
ओडिशाच्या बालासोरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला होता.
ओडिशा : Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघाताबाबत रेल्वे बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनेचा खुलासा केला आहे.
त्यानंतर आता अपघातग्रस्त भागातून पहिली ट्रेन रवाना झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला. तब्बल 51 तासांनी बालासोर येथील अपघातग्रस्त भागातून पहिली ट्रेन रवाना झाली.
"अपघातग्रस्त डाऊन लाईन पूर्णपणे पूर्ववत करण्यात आली आहे. या भागातून पहिली ट्रेन रवाना झाली आहे." असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट केलं आहे.