'काँग्रेसची 96 जागांवरील चर्चा पूर्ण​'; काँग्रेस-शिवसेनेत कसलाही वाद आता नाही - नाना पटोले

'काँग्रेसची 96 जागांवरील चर्चा पूर्ण​'; काँग्रेस-शिवसेनेत कसलाही वाद आता नाही - नाना पटोले

कॉंग्रेसची 96 जागांबाबत चर्चा पूर्ण झाली असून राज्यात महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत.
Published by :
shweta walge
Published on

कॉंग्रेसची 96 जागांबाबत चर्चा पूर्ण झाली असून राज्यात महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंगळवारी पुन्हा चर्चा करणार आहे. चर्चेनंतर उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी दिली आहे. महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात बैठक झाली. या बैठकीनंतर पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव होईल. पराभवाच्या भितीने भाजपा अशी खेळी करत आहे. काँग्रेस कडूनही अशा पद्धतीचे कोणतेही विधान केलेले नाही. महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आणण्यासाठी आमच्या सर्वांचे एकत्रित प्रयत्न सुरु आहेत”, असं नाना पटोले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com