लाडक्या बाप्पाचे दर्शन होणार; लालबागच्या राजाच्या मूर्तीची पहिली झलक पाहा ‘इथे’ LIVE
कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. जिकडे तिकडे मोठ मोठ्या गणपतींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. यातच सर्वांना ओढ लागली होती ती त्या नवसाला पावणारा बाप्पा' अशी ख्याती असलेल्या मुंबईतील 'लालबागच्या राजाच्या मूर्तीची पहिली झलक पाहण्याची. आता भाविकांची ही उत्सुकता आज संपणार आहे. आज लालबागच्या राजाची पहिली झलक पाहायला मिळणार आहे.
जून महिन्यात लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला. लालबागच्या राजाची मूर्ती बाहेरून न आणता या ठिकाणीच घडवली जाते. त्याच्या पाद्यपूजनाच्या सोहळ्यानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरूवात होते.
लालबागचा राजा मंडळाच्या सर्व अधिकृत सोशल मीडियाबावर भक्तांना घरबसल्या गणपतीचे दर्शन घेता येणार आहे. हा सोहळा आज २९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता पार पडेल यानंतर विशेष फोटोशूट होणार असून लवकरच बाप्पाचे फोटो सुद्धा पाहायला मिळतील.
लालबागच्या राजाची पहिली झलक लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत फेसबुक पेज, ट्विटर, यु ट्यूब वर ऑनलाइन पाहायला मिळणार आहे. लाखो भाविक लालबागच्या राजाची वाट पाहत असतात. त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा आपलं 89 वा गणेशोत्सव सोहळा साजरा करणार आहे. यंदा मंडळातर्फे बुधवारी म्हणजेच, 31 ऑगस्ट 2022 ते रविवार 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत साजरा होणार आहे.
आज मुंबईचा राजा म्हणजेच गणेशगल्लीचा राजा मंडळाने सुद्धा बाप्पाचे पहिले दर्शन आयोजित केले आहे. फेसबुक, इंस्टाग्रामसह सोशल मीडियावर आपणही ही झलक पाहू शकता.