ताज्या बातम्या
Brijbhushan Singh : बृजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल; काय आहे प्रकरण?
भारतीय कुस्तीचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय कुस्तीचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल करण्यापूर्वी दिल्ली पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली.
एका अल्पवयीन मुलीसह सात कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोपांनंतर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
बृजभूषण सिंह यांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कुस्तीपटूंनी घेतला आहे. एफआयआर नोंदवण्यासाठी नवी दिल्लीतील सुमारे 10 पोलीस अधिकाऱ्यांना ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आली आहे.