अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची आशा सेविका, अंगणवाडी सेविकांसाठी मोठी घोषणा
आज अर्थसंकल्प सादर झाले. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे अखेरचे हे अधिवेशन होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण या अर्थसंकल्पानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.
अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यावेळी निर्मला सितारमण यांनी सांगितलं आहे की, पीएम आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात 70 टक्के महिलांना घरं मिळाली. गेल्या 10 वर्षांत महिला सक्षमीकरणावर भर देण्यात आला. तिहेरी तलाक प्रथा बंद केली. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लसीकरण वाढविले जाईल, सर्व क्षेत्रांमध्ये नॅनो DAP चा वापर वाढविला जाईल. असे देखील सांगण्यात आले.
तसेच आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली की, सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना आता आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार असल्याचे निर्मला सितारमण यांनी सांगितले.