Waqf Bill JPC Meeting: BJP अन् TMC नेत्यांमध्ये जोरदार राडा! फोडली काचेची बोटल, TMC नेते जखमी
वक्फ बोर्डासंबंधीच्या विधेयकासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या अर्थात जेपीसीच्या बैठकीत आज जोरदार राडा झाला. भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार या बैठकीत भिडलेले पाहायला मिळाले. यामध्ये मर्यादेबाहेरचं कृत्य केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना निलंबित करण्यात आलं आहे.
वक्फ विधेयकावर आज संयुक्त संसदीय समितीची बैठक सुरु होती. यादरम्यान तृणमूलचे सदस्य कल्याण बॅनर्जी यांची भाजपचे सदस्य अभिजीत गंगोपाध्याय यांच्याशी जोरदार वादावादी झाली. या वादावादीत कल्याण बॅनर्जी संतापच्या भरात टेबलवरच पाण्याची काचेची बाटली फोडली यामुळं त्यांच्या हाताला दुखापत झाली. परिणामी त्यांना चार टाकेही लागले आहेत. या राड्यामुळे बैठकी थोडावेळासाठी स्थगित करण्यात आली.
का झाला हा वाद?
भाजपच्या जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीतील सदस्य सेवानिवृत्त न्यायाधीश आणि वकिलांच्या गटाकडून मांडले जाणारे मुद्दे ऐकत होते. त्याचवेळी विरोधी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला की, या विधेयकामुळं त्यांचा काय फायदा होणार आहे.
या बैठकीत अनेक निवृत्त न्यायाधीश, वरिष्ठ अधिवक्ता आणि अभ्यासक उपस्थित होते. या दरम्यान कल्याण बॅनर्जी उठून बोलू लागले. ते याआधीही बैठकीत अनेकदा बोलले होते. मात्र यावेळी जेव्हा ते मध्येच बोलू लागले, तेव्हा अभिजीत गंगोपाध्याय यांनी आक्षेप घेतला. यानंतर मग कल्याण बॅनर्जीनी अभिजीत गंगोपाध्याय यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यामुळे भडकलेल्या गंगोपाध्याय यांनीही त्यांना तशाच शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले आणि वाद उफाळला.