मुंबईतल्या कांदिवलीत गुंडाकडून महिला पीएसआयचा विनयभंग
मुंबईत पोलिसांचं राज्य आहे की गुंडांचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतल्या कांदिवलीत गणेशविसर्जनावेळी बंदोबस्तावर असलेल्या गुंड हरिश मांडवेकर आणि त्याच्या साथीदारांनी महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केला आहे. कांदिवली पश्चिमेच्या डहाणूकरवाडीच्या विसर्जन तलावावर गुंड मांडवीकर यानं त्याच्या तीन साथीदारासह दादागिरी केली.
शिवाय महिला पोलिसांना धक्काबुक्की केलीय. या प्रकरणी हरीशसह दीपक पांडे, हरिष चौधरी आणि राजेश कोकिसरेकर या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हरिश मांडवीकर याच्यावर तब्बल 11 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
हरिश मांडवीकर स्वतःला पोलीसांपासून संरक्षण मिळावं यासाठी अनेक राजकीय नेत्यांच्या आश्रयाला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. नेत्यांसोबत फोटो काढणं, आमदार, खासदार, मंत्र्यांचे बॅनर लावून पोलिसांवर अप्रत्यक्ष दबाव आणत असल्याचा आरोप होत आहे.