'साहेब देणार असाल तर सांगा, नाहीतर राम राम' शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना सुनावले खडेबोल
'अभ्यास करतो, समिती नेमतो, हे काही सांगू नका, देणार असाल तर आता सांगा नाहीतर राम राम, इतकं आम्ही वैतागलोय' अशा शब्दात मौजे सुकेणे तालुका निफाड येथील गारपीटग्रस्त युवा शेतकरी भारत राजाराम मोगल यांनी पालकमंत्री दादाजी भुसे यांना नैसर्गिक आपत्तीने हतबल होऊन खडे बोल सुनावले आहेत.
पालकमंत्री दादाजी भुसे कसबे व मौजे सुकेने शिवारातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी युवा शेतकरी भारत मोगल हे शेतकरी आणि द्राक्ष बागातदारांची बाजू मांडत होते. अतिशय भावना विवाह आणि नैसर्गिक आपत्ती पुढे हतबल होऊन मोगल यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करत संतापाने भुसे यांना शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी सांगितले.
अनेकवेळा नैसर्गिक आपत्ती येते परंतु पंचनामे झाल्यानंतरही शासकीय मदत लवकर पोहोचत नाही. इतरही शासकीय योजना कर्जमाफी असेल किंवा प्रोत्साहन अनुदान असेल यापासून अजूनही अनेक शेतकरी वंचित असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली हे एका शेतकऱ्याने तरी भावना मांडली असली तरी निफाड तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात संतप्त झालेला असून त्याचे परिणाम पुढील काही काळात पाहिल्यास मिळू शकतात.