video | Kalyan police
video | Kalyan policeteam lokshahi

पोलिसांनी केक कापू दिला नाही, समर्थकाच्या दाव्याने घटनेला वेगळे वळण

समर्थकाच्या दाव्याने घटनेला वेगळे वळण
Published by :
Shubham Tate
Published on

कल्याण (अमजद खान) : पोलिस व्हॅनमध्ये आरोपीकडून केक कापल्या गेल्याच्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. कारण व्हीडीओ काढणाऱ्या तरुणाने दावा केला आहे की, गार्डने केक कापू दिला नाही. जाणूनबुजून पोलिसांना बदनाम करण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. सूरज सिंग या तरुणाच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. (False allegations against Kalyan police)

video | Kalyan police
…तर मुख्यमंत्री सुध्दा थेट जनतेतून निवडून द्या : अजित पवार

2 ऑगस्टच्या रोजी उल्हासनगरचा कुख्यात गुंड रोशन झा याचा वाढदिवस होता. रोशन झा हत्येचा प्रयत्न या प्रकरणात जेलमध्ये आहे. 2 तारखेला त्याचा वाढदिवस आणि त्याच दिवशी त्याची तारीख होती. कोर्टात आला असता पोलिस व्हॅनमध्ये बसून त्याने केक कापला. असा एक व्हीडीओ सोशल मिडियावर चांगला व्हायरल झाला होता. मात्र या प्रकरणाला वेगळे लागताना दिसून येत आहे. ज्या तरुणाने व्हीडीओ केला होता.

video | Kalyan police
चेन स्नेचरने धूम स्टाईलने महिलेचे मंगळसूत्र आणि चैन केली लंपास

तो तरुण सूरज सिंग होता. त्याने त्याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे की, हे खरे आहे की, रोशन झाचा वाढ दिवस होता. त्याच्या समर्थकांनी केक आणला होता. मात्र पोलिसांनी मज्जाव केल्याने केक कापला गेला नाही. जेव्हा रोशन झा याची तारीख घेतल्यानंतर त्याला पोलिस व्हॅनमध्ये बसवले. त्याच्या एका समर्थकाने केक त्याच्यासमोर होता. रोशन झाच्या हाती लाकडी चाकू दिला. मात्र ऐन वेळी पोलिसांनी झा याचा हात केक कापण्यापूर्वी मागे घेतला. हे देखील व्हीडीओमध्ये दिसून येत आहे. सूरज सिंग यांच्या या खुलाशानंतर या घटनेला वेगळे वळण लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com