राज्‍यातील मच्‍छीमार, मत्‍स्‍यसंवर्धक व मत्‍स्‍यव्‍यवसाय सहकारी संस्‍थांना तलाव ठेका रक्‍कम भरण्‍यास मुदतवाढ : सुधीर मुनगंटीवार

राज्‍यातील मच्‍छीमार, मत्‍स्‍यसंवर्धक व मत्‍स्‍यव्‍यवसाय सहकारी संस्‍थांना तलाव ठेका रक्‍कम भरण्‍यास मुदतवाढ : सुधीर मुनगंटीवार

राज्‍यातील मच्‍छीमार, मत्‍स्‍यसंवर्धक व मत्‍स्‍यव्‍यवसाय सहकारी संस्‍थांना क्षमतेनुसार मासेमारी करता न आल्‍याने सन २०२१-२२ या वर्षाची तलाव ठेका रक्‍कम भरण्‍यास मुदतवाढ देण्‍याचा निर्णय मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अनिल ठाकरे, चंद्रपूर

राज्‍यातील मच्‍छीमार, मत्‍स्‍यसंवर्धक व मत्‍स्‍यव्‍यवसाय सहकारी संस्‍थांना क्षमतेनुसार मासेमारी करता न आल्‍याने सन २०२१-२२ या वर्षाची तलाव ठेका रक्‍कम भरण्‍यास मुदतवाढ देण्‍याचा निर्णय मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. कोरोना संसर्गाच्‍या दुस-या लाटेच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यात घोषित लॉकडाऊनमुळे मासेमारी करता न आल्‍याने तसेच उत्‍पादीत मासळीची विक्री करण्‍यास पुरेसा वाव न मिळाल्‍यामुळे त्‍यांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत असल्‍याने राज्‍यातील मच्‍छीमार सहकारी संस्‍थांनी केलेली विनंती विचारात घेवून मच्‍छीमारांना आार्थिक दिलासा देण्‍याच्‍या दृष्‍टीने राज्‍यातील मासेमारीकरिता ठेक्‍याने देण्‍यात आला.

तलाव तसेच जलाशयांची सन २०२१-२२ ची वार्षीक तलाव ठेका रक्‍कमेचा भरणा करण्‍यास दिनांक ३१ जुलै २०२२ पासून पुढे २०२१-२२ ची तलाव ठेका माफी प्रस्‍ताव मंत्री मंडळासमोर सादर होईपर्यंत मुदतवाढ देण्‍याचे निर्देश मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. या मुदतवाढीचा लाभ राज्‍यातील १३७३ मच्‍छीमार सहकारी संस्‍थांना तसेच ४२० खाजगी ठेकेदारांना होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com