Odisha Train Accident: ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचा भीषण अपघात; मृतांच्या नातेवाईकांना 12 लाखांची मदत जाहीर
ओडिशा : Odisha Train Accident: बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 900 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या जखमी प्रवाशांना सोरो आणि गोपालपूर रुग्णालयात उपचारांकरीता हलवण्यात आले आहे. गंभीर जखमी प्रवाशांना अतिदक्षता विभागात पाठवले जाईल, असे ओडिशाच्या मुख्य सचिवांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर आता या भीषण अपघातामुळे ओडिशामध्ये एक दिवसीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राज्यात आज कोणत्याही प्रकारचा राज्य उत्सव साजरा वा कार्यक्रम होणार नसल्याचेही राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सांगितले.
तसेच ओडिशामध्ये जो अपघात झाला त्या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना १२ लाखांची मदत जाहीर झाली आहे. पंतप्रधान कार्यालय आणि रेल्वे मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. ट्रेनचे डबे रुळावरून घसरण्याचे कारण तपासण्याचेही आदेश देण्यात आल्याची माहिती आश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.