ताज्या बातम्या
गुजरातचा पांढरा कांदा निर्यातीस परवानगी; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
केंद्र सरकारने गुजरातमधून दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे.
केंद्र सरकारने गुजरातमधून दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता ट्विट करत रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, मतदान सुरु होताच केंद्र सरकारने गुजरातच्या कांदा निर्यातीला परवानगी दिली पण महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अश्रू मात्र केंद्र सरकारला अजूनही दिसत नाहीत.
तसेच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातला शेतकरी हा शेतकरी नाही का? की #मोदी_का_परिवार मध्ये महाराष्ट्रातील शेतकरी येत नाहीत? भाजपावाले आणि भाजपासोबत गेलेले 'विकासा'वाले यावर तोंड उघडणार का? केंद्र सरकारला जाब विचारणार का? असे रोहित पवार म्हणाले.