ताज्या बातम्या
Rice Export : आता कांद्यानंतर तांदूळ निर्यातीवर निर्बंध!
केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने कांद्यानंतर आता उकड्या तांदळावर निर्यात शुल्क लागू करण्याच निर्णय घेतला आहे. उकड्या तांदळावर म्हणजेच पारबॉईल्ड तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे तांदळाच्या निर्यातीला आळा बसणार आहे आणि याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. तांदळाचा देशांतर्गत पुरेसा साठा राखणे आणि तांदळाच्या देशांतर्गत किमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हे मोठं पाऊल उचललं आहे. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 25 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेले हे निर्यात शुल्क 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत लागू असेल.