कोरोना लस आता नाकावाटे दिली जाणार; तज्ज्ञ समितीकडून लसीच्या वापराला मंजुरी

कोरोना लस आता नाकावाटे दिली जाणार; तज्ज्ञ समितीकडून लसीच्या वापराला मंजुरी

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चीन सह इतर काही देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चीन सह इतर काही देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीन, ब्राझीलमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. काही महिन्यांपूर्वी दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा लाखांवर पोहोचला होता. आतापर्यंत देशात 4 कोटी 46 लाख 76 हजार 199 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

भारतात आता नाकावाटे कोरोना लस दिली जाणार आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या समितीकडून नेझल कोरोना वॅक्सिन वापरण्यास मंजुरी दिली आहे. कोरोना संदर्भातील आरोग्य तज्ज्ञांच्या समितीने प्रौढांसाठी नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला मंजुरी देत बूस्टर डोस म्हणून नेझल कोरोना वॅक्सिनची शिफारस केली आहे. आरोग्यमंत्र्यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नेझल वॅक्सिनला तज्ज्ञांच्या समितीने 18 वर्षांवरील नागरिकांवरील वापरासाठी मंजुरी दिल्याचं सांगितलं आहे. मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत सांगितले की, आता तज्ज्ञांच्या समितीनेही नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे, यामुळे येत्या काही दिवसांत कोणत्याही व्यक्तीला इंजेक्शनद्वारे कोरोना लस घेण्याची गरज भासणार नाही आणि थेट नाकावाटे कोरोना लस देण्यात येईल. असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.

तसेच त्यांनी सांगितले की, औषध नियामक प्रशासनाने (DCGI) ने याआधीच भारत बायटेकच्या नेझल वॅक्सिनला मंजुरी दिली होती. भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) ChAd36-SARS-CoV-S COVID-19 नेझल वॅक्सिनला आपात्कालीन वापरासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये मंजुरी देण्यात आली. भारत बायोटेकच्या BBV-154 इंट्रानॅसल लशीला DGCI ने आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.

कोरोना लस आता नाकावाटे दिली जाणार; तज्ज्ञ समितीकडून लसीच्या वापराला मंजुरी
भारतात आढळला कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण; परदेशातून आलेल्या महिलेला नव्या व्हेरियंटची लागण
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com