खळबळजनक! उस्मानाबाद, औरंगाबादसह राज्यात आजही बालविवाहाचे प्रमाण बहुतांश
बाल विवाह हा प्रश्न आजही चर्चेत आहे. कायदेशीर रित्या आजही बाल विवाह हा गुन्हा मानला जातो. २१ व्या शतकात देखील बालविवाह ही परंपरा आटोक्यात आलेली नाही. उस्मानाबाद, औरंगाबादसह इतरही राज्यात बालविवाहाच्या संख्येत भर पडताना दिसून येत आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाकडून, बाल विवाहाचे प्रमाण आधिक झाल्याची माहिती समोर आली आहे. लॉकडाउनमध्ये बालविवाहाच्या परंपरेला अधिकच उधान आल्याचे दिसून आले. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, २०१९-२० या वर्षात १८ वर्षांखालील मुलींच्या लग्नाचे प्रमाण राज्यात २१.९ टक्के, तर २१ वर्षांखालील मुलांच्या लग्नाचे प्रमाण १०.५ टक्के असल्याचे समोर आले आहे. मुलींच्या बालविवाहाचे प्रमाण २३.३ टक्के, तर मुलांच्या बालविवाहाचे प्रमाण १७.७ टक्के आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच असल्याचे दिसून येत आहे.
विशिष्ट राज्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ नुसार राज्यात उस्मानाबाद, औरंगाबाद, अहमदनगर, लातूर, नंदुरबारसह पुण्यातसुद्धा आधिका-आधिक बालविवाह आजही होत असल्याचे आढळून येत आहेत. बालविवाह झालेल्या मुलींची शारीरिक व मानसिक स्थिती विकसित नसते, लहान वयात लग्न झाल्यामुळे लैंगिकतेचे पुरेसे ज्ञान नसते व मुलींची लैंगिक प्रगतीही पुरेशी झालेली नसते. अश्या स्थितीत वयाच्या १८ व्या वर्षाच्या आतच जर मुलीची गर्भधारणा झाली तर, ते बाळाच्या पोषणासाठी बिलकुलच सक्षम ठरत नाही.
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण अधिकतम झाल्याचे आढळून आले. राज्य सरकारमार्फत क्राय (चाइल्ड राइट्स) ही संस्था मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात, पाड्यात अंगणवाडीसेविका, आशासेविका, पोलीसपाटील यांच्यासह कार्यरत राहून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. बालविवाह ही परंपरा कायद्याने जरी गुन्हा असला तरही, आजच्या काळात हे घडणे म्हणजेच विचारशक्तीला काळिमा फासल्यासारखे आहे. याला वेळीच जरब बसयला हवा.
बालविवाहाच्या प्रमाणाचा आराखडा:
राज्य शहरी ग्रामीण एकूण
मुली १५.७ २७.६ २१.९
मुले ९.६ ११.३ १०.५
देश शहरी ग्रामीण एकूण
मुली १४.७ २७ २३.३
मुले ११.३ २१.१ १७.७
राज्यातील स्थिती
(राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ - २०२०- २१)
जिल्हा प्रमाण
अहमदनगर :- २६.९
औरंगाबाद :- ३५.८
गडचिरोली :- १०.१
लातूर :- ३१
मुंबई :- ४.५
नंदुरबार :- २४
उस्मानाबाद :- ३६.६
पुणे :- २४
वर्धा :- ९