Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकी प्रकरणात खळबळजनक माहिती समोर;  'स्नॅपचॅट'वर रचला कट

Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकी प्रकरणात खळबळजनक माहिती समोर; 'स्नॅपचॅट'वर रचला कट

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांचा अखेर गोळीबारात मृत्यू झाला आहे. बांद्र्यातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयावर जवळ बाबा सिद्दीकी यांच्यावर ३ अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला.
Published by :
shweta walge
Published on

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांचा अखेर गोळीबारात मृत्यू झाला आहे. बांद्र्यातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयावर जवळ बाबा सिद्दीकी यांच्यावर ३ अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पोलिसांनी यामध्ये तिघांना ताब्यात घेतलं आहे. तर अन्य आरोपींचा शोध चालू आहे. याच प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. स्नॅपचॅट या मेसेजिंग अॅपमध्येच सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

सूत्रांच्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसंदर्भात आरोपींना सर्व माहिती स्नॅपचॅटच्या माध्यमातून दिली जायची. या अॅपमध्ये येणारे सर्व मेसेज वाचून आरोपी ते मेसेज लगेच डिलीट करायचे. या आरोपींना घरासाठी बनवण्यात आलेले आधारकार्डही स्नॅपचार्ट याच अॅपवर पाठवण्यात आले होते. स्नॅपचॅटवर पाठवण्यात आलेल्या आधारकार्डचा स्क्रीनशार्ट काढून ते लगेच डिलिट करण्याच्या सूचना आरोपींना देण्यात आली होती. तशी कबुली आरोपींनी दिली आहे.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपी गुरुमेल सिंह याने मागच्या महिन्यात सलमान खानच्या घराची रेकी केली होती, अशी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबारानंतर कोणतीही माहिती समोर येऊ नये म्हणून आरोपी गुरमेल सिंह यांने गार्डनमध्ये त्याच्या मोबाईलचा डिसप्ले तोडला होता.

Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकी प्रकरणात खळबळजनक माहिती समोर;  'स्नॅपचॅट'वर रचला कट
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट; आरोपींनी अभिनेता सलमान खानच्या घराचीही केली होती रेकी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com