Nandurbar News
Nandurbar NewsTeam Lokshahi

Nandurbar : अवैध मद्याच्या वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह 1 कोटी 14 रुपयांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होत नसल्याने जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही मोठी कारवाई केली.
Published by :
Sudhir Kakde
Published on

नंदुरबार | प्रशांत जव्हेरी : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर स्थानिक पोलिसांकडून कारवाई सुरू होती. यानुसार अवैधरीत्या अन्‍य राज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई केली आहे. यात 1 कोटी 14 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होत नसल्याने जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर राज्य उत्पादन शुल्क विभाग ऍक्शन मोडमध्ये आल्याने गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथकाने नंदुरबार तालुक्यातील न्याहली शिवारात दोंडाईचा ते नंदुरबार रस्ता न्याहली गावाजवळ कारावई केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईमध्ये टाटा कंपनीचा पॅक बॉडी असलेला कंटेनर (क्र. MH- 46- F 4868) सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये रॉयल ब्ल्यु व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेच्या एकुण 1 लाख 3680 पेट बाटल्या (2160 बॉक्स) दिसुन आले. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949अंतर्गत कलमान्वये करण्यात आली. सदरची कार्यवाही डी. एम. चकोर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार, पी. जे. मेहता, दु. निरीक्षक, एस.एस. रावते दुय्यम निरीक्षक, पी. एस. पाटील दु.निरीक्षक सोबत जवान सर्वश्री अविनाश पाटील, भुषण एम.चौधरी, हितेश जेठे, वाहन चालक हेमंत पाटील, राजेंद्र पावरा, एम.एम. पाडवी, संदीप वाघ, हर्षल नांद्रे इत्यादींनी पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी. जे. मेहता दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार हे करीत आहेत.

Nandurbar News
CM मला तुमच्याशी बोलायचंय |राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला कोण जबाबदार ?

1 कोटी 14 लाखाचा मुद्देमाल जप्‍त

सदर कारवाईत वाहनासह संशयित आरोपी रोहित जालिंधर खंदारे (रा. पोखरापुर खंदारे वस्ती ता. मोहोळ जि. सोलापुर), अविनाश मोहन दळवे (रा.पोखरापुर, ता. मोहोळ जि. सोलापुर) यांना अटक करण्यात आली असून कंटेनरसह एकुण 1 कोटी 14 लाख 68 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com