Mohammad Hamid Ansari | journalist nusrat mirza
Mohammad Hamid Ansari | journalist nusrat mirza team lokshahi

'माझ्याविरोधात खोटी माहिती पसरवली जातेय, मी ना फोन केला ना भेटलो'

यात भाजपच्या अधिकृत प्रवक्त्याचाही समावेश
Published by :
Shubham Tate
Published on

Mohammad Hamid Ansari : नुसरत मिर्झा या पाकिस्तानी पत्रकाराच्या दाव्याने भारताच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून वाद वाढल्यानंतर खुद्द माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. हमीद अन्सारी यांनी म्हटले आहे की, मी त्यांना फोन केला नाही किंवा भेटलो नाही. हमीद अन्सारी यांनी माझ्याविरोधात खोटे बोलले जात असल्याचे वक्तव्य केले आहे. यामध्ये भाजपच्या अधिकृत प्रवक्त्याचाही समावेश आहे. (ex vice president hamid ansari reacts over pak journalist nusrat mirza claims of spying)

Mohammad Hamid Ansari | journalist nusrat mirza
अँड्रॉइड वापरकर्ते सावधान! व्हॉट्सअॅपच्या सीईओंनी दिला इशारा

हमीद अन्सारी म्हणाले की, भारताचे उपराष्ट्रपती या नात्याने मी पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांना निमंत्रित केले आहे, असे या निवेदनात म्हटले जात आहे. त्यांच्या स्पष्टीकरणात ते म्हणाले की उपराष्ट्रपतींकडून परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्याची प्रक्रिया सरकारच्या सल्ल्यानुसार केली जाते आणि त्यात प्रामुख्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा समावेश असतो हे सर्वज्ञात सत्य आहे. ते म्हणाले की, मी या व्यक्तीला कधीही आमंत्रित केले नाही आणि मी त्याला कधीही भेटलो नाही.

Mohammad Hamid Ansari | journalist nusrat mirza
जाणून घ्या देशाची लोकसंख्या किती वेगाने वाढतेय? 'धर्म' संकट किती मोठे

दरम्यान, पाकिस्तानी पत्रकाराच्या खुलाशानंतर भाजपने काँग्रेस (Congress) आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर आरोप करत काही सवाल उपस्थित केले आहेत. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सांगितलं की, "पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी खुलासा केला की, तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्याला पाच वेळा भारतात आमंत्रित केलं होतं. भारत दौऱ्यावर असताना त्यांनी भेटण्यासाठी बोलावलं असता, संवेदनशील आणि अत्यंत गोपनीय माहिती दिली जात होती. आपण पाच वेळा भारताला भेट देऊन हमीद अन्सारी (Hamid Ansari) यांच्याकडून माहिती घेतली आणि ती भारताविरुद्ध वापरली. भारताला कमकुवत करण्यासाठी ही माहिती आयएसआयसोबत शेअर करण्यात आली होती. ही गोपनीय माहिती शेअर करायची हे काँग्रेस सरकारचं धोरण होतं का? देशातील जनतेनं अन्सारींना आदर दिला. त्या बदल्यात त्यांनी काय दिलं? काँग्रेस पक्षाने उत्तर देऊ नये का? 2010 मध्ये अन्सारी यांनी दयाळूपणे या पत्रकारांना दहशतवादाच्या चर्चासत्रात आमंत्रित केलं, मग भारताने दहशतवादाचा सामना कसा करावा?

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com