ताज्या बातम्या
चिपळूणच्या सुकन्या माजी खासदार सुमित्राताई महाजन महाराष्ट्राच्या राज्यपाल होणार?
आठ वेळा इंदूरच्या खासदार राहिलेल्या आणि चिपळूणच्या सुकन्या सुमित्रा महाजन 'ताई' यांचे राजकीय पुनर्वसन महाराष्ट्राच्या राज्यपालपदी होऊ शकते.
निसार शेख, प्रतिनिधी
आठ वेळा इंदूरच्या खासदार राहिलेल्या आणि चिपळूणच्या सुकन्या सुमित्रा महाजन 'ताई' यांचे राजकीय पुनर्वसन महाराष्ट्राच्या राज्यपालपदी होऊ शकते. ही माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे त्यावर भाजपच्या केंद्रीय समितीत विचार केला जात आहे.
1989 ते 2014 या काळात लोकसभा निवडणुकीत सातत्याने खासदार म्हणून निवडून आलेल्या 'ताईं 'नी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने भाजपने त्यांच्या नावाची घोषणा करण्यास विलंब केला होता. गेल्या आठ निवडणुकांमध्ये भाजपच्या पहिल्या किंवा दुसऱ्या यादीत ताईंचे नाव घोषित व्हायचे. यावेळी वयाच्या 75 फॉर्म्युला आल्याने 'ताई' निवडणूक लढवणार की नाही याबाबत निवडणुकीपूर्वी अटकळ बांधली जात होती.सुमित्रा ताई महाजन महाराष्ट्र राज्यपाल झाल्या तर चिपळूणच्या शिरपेचात मानाचा तोरा रवला जाणार आहे .