Shinzo Abe Death : गोळीबारात जखमी झालेले जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंचे निधन
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. आबे यांना दोन गोळ्या लागल्या. दुसरी गोळी त्यांच्या पाठीला लागली, ज्यामुळे ते जमिनीवर पडले. गोळी लागल्यानंतर त्यांनी हदयविकाराचा झटका आला. जपानी मीडियाच्या वृत्तानुसार त्याच्या हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. काही वेळानंतर रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या शिंजो आबे यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे निवडणुकीचा प्रचार करत होते. यावेळी त्यांच्यावर कॅमेऱ्यासारख्या दिसणाऱ्या हॅन्डहेल्ड बंदुकीने हल्ला करण्यात आला. गोळीबारानंतर आलेल्या फोटोवरून ही बाब समोर आली आहे.
हल्लेखोराने बंदुकीची रचना अशा प्रकारे केली होती की ती कॅमेरासारखी दिसत होती. त्यासाठी त्याने बंदुकीवर काळे पॉलिथिन गुंडाळले होते. त्याने 100 ते 150 मीटर अंतरावरून शिंजो आबे यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
हल्लेखोर फोटो काढण्याच्या बहाण्याने आबे यांच्या जवळ आल्याचे समजते. त्यानंतर त्याने गोळीबार केला. आबे यांच्यावर मागून दोन वेळा गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी घटनास्थळी 42 वर्षीय हल्लेखोर यामागामी तेत्सुयाला अटक केली.
हल्लेखोर फोटो काढण्याच्या बहाण्याने आबे यांच्या जवळ आल्याचे समजते. त्यानंतर त्याने गोळीबार केला. आबे यांच्यावर मागून दोन वेळा गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी घटनास्थळी 42 वर्षीय हल्लेखोर यामागामी तेत्सुयाला अटक केली.
जपानमध्ये बंदुक वापरण्यासंदर्भात कठोर कायदे आहेत. दरवर्षी गोळीबाराच्या घटनांमध्ये मृतांचा आकडा हा केवळ युनिटचा आकडा राहिला आहे. जपानी माध्यमांनुसार शिंजो यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांचे ह्रदय काम करत नाही. यासंदर्भात अधिकृत वृत्त आले नाही.