Elon Musk
Elon Muskटिम लोकशाही

ट्रम्प प्रशासनात इलॉन मस्क यांना मिळालं महत्त्वाचं स्थान

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामध्ये अमेरिकेतील उद्योगपती इलॉन मस्क यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं स्वत: ट्रम्प यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मस्क यांना मंत्रिमंडळात विशेष स्थान देण्यात आलं आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

एकीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामध्ये अमेरिकेतील उद्योगपती इलॉन मस्क यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं स्वत: ट्रम्प यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मस्क यांना मंत्रिमंडळात विशेष स्थान देण्यात आलं आहे.

अमेरिकेतील मोठे उद्याोगपती इलॉन मस्क यांची ‘प्रशासन कार्यक्षमता’ खात्याच्या (डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी - ‘डॉज’) प्रमुखपदी नियुक्ती केल्याची घोषणा अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. भारतीय वंशाचे राजकारणी विवेक रामस्वामी यांच्यासह मस्क या नव्या खात्याचा कार्यभार सांभाळणार आहेत.

नोकरशाहीमध्ये अमूलाग्र सुधारणा करून प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट मस्क आणि रामस्वामींसमोर ठेवण्यात आले आहे टेस्ला, स्पेस एक्स, एक्स (ट्विटर) या बड्या कंपन्यांचे मालक असलेल्या मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रचारात हिरिरीने सहभाग घेत त्यांच्या विजयात मोठा हातभार लावला होता. त्यानंतर आता पुढील चार वर्षे अमेरिकन प्रशासनाचा गाडा ‘रुळावर’ आणण्याची जबाबदारी ट्रम्प यांनी मस्क यांच्या खांद्यावर टाकली आहे.

अनेक वर्षांपासून ‘डॉज’ खात्याचे स्वप्न रिपब्लिकन पक्षाने पाहिले होते. अध्यक्षीय निवडणुकीनंतर ‘सेनेट’ आणि ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह्ज’ या कायदेमंडळाच्या दोन्ही सभागृहांत पक्षाला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे हे खाते आणि मस्क-रामस्वामी यांच्या नियुक्तीमध्ये कोणतीही अडचण येण्याची शक्यता नसल्याचे मानले जात आहे.

अन्य नियुक्त्या

● गृहमंत्री : क्रिस्टी नोएम

● राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार : माइक वॉल्टझ

● सीआयए प्रमुख : जॉन रॅटक्लिफ

● पश्चिम आशिया राजदूत : स्टीव्ह सी. विटकॉफ

● व्हाईट हाऊस सचिव बिल मॅकगिनल

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com