टि्वटरला ३.२ लाख कोटीत घेण्याची ऑफर, जाणून घ्या कोण घेणार

टि्वटरला ३.२ लाख कोटीत घेण्याची ऑफर, जाणून घ्या कोण घेणार

Published by :
Team Lokshahi
Published on

टेस्लाचे सीईओ एलन मस्क ( Elon Musk) हे टि्वटर(Twitter) कंपनी खरेदी करणार आहेत.एलन यांनी टि्वटरमध्ये 54.20 डॉलर प्रति शेअर (Share) विकत घेण्याचे ठरवले आहे. तब्बल ३.२ लाख कोटींची ही डिलिंग आहे. या वृत्तानंतर टि्वटरचे शेअरचे दर वाढले आहे. सुमारे 12 टक्क्यांनी त्यात वाढ झाली.

मस्क यांनी टि्वटरमध्ये 9 टक्के शेअर खरेदी केले असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. एलन मस्क म्हणाले की, टि्वटरला माझ्याकडून ही शेवटची आणि चांगली ऑफर आहे. कंपनीने या ऑफरवर गांभीर्याने विचार न केल्यास मी टि्वटरमधील माझ्या गुंतवणुकीबाबत फेरविचार करेल. टि्वटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की एलन मस्क यांना टि्वटर कंपनीच्या संचालक मंडळात स्थान देण्याचा निर्णय झाला होता.परंतु एलन यांनी मस्क यांनी टि्वटरच्या संचालक मंडळात सामील होण्यास नकार दिला असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com