कार्पोरेट अफेअर : गुगलच्या सहसंस्थापकाच्या पत्नीचे टेस्लाच्या सीईओशी अफेअर, पुढे काय झाले...
गुगलचे सह-संस्थापक सर्जी ब्रिनने त्यांची पत्नी निकोल शानाहान हिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येताच एलन मस्क आणि ब्रिन यांची पत्नी निकोल शानाहान यांचे गेल्या वर्षभरापासून अफेअर सुरू असल्याच्या बाबीला पुन्हा उधाण आले
गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन आणि त्यांची पत्नी निकोल शॅनाहॅनने जानेवारी महिन्यात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. हा घटस्फोट का होत आहे, याची आता एक नवी माहिती समोर येत आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्यासमवेत शॅनाहॅनच्या संबंधांमुळे घटस्फोटापर्यंत प्रकरण गेल्याचे वृत्त आहे. यासंबंधामुळे सर्गेई आणि मस्क यांच्यातील जुनी मैत्री संपुष्टात आली आहे.
एका पार्टीत मस्क यांनी सर्गेई यांच्यासमोर गुडघ्यावर बसत त्यांची माफी मागितली. गुगलच्या सह-संस्थापकांनी ते स्वीकारले. मात्र मस्क यांच्याशी त्यांचे जुने संबंध आता राहिले नाहीत. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या अमेरिकन वृत्तपत्राने दावा केला की, गेल्या काही महिन्यांपासून दोघांमधील तणाव वाढला आहे. सर्गेई यांनी मस्क यांच्या कंपनीतील आपली गुंतवणूक काढून घेण्यास सांगितले आहे.
वृत्तानुसार, गतवर्षी डिसेंबर महिन्यात मस्क यांची शॅनाहॅनबरोबर मियामीत आर्ट बॅसेलमध्ये भेट झाली. दोघांमधील संबंध काही काळच होते. त्या वेळी मस्क यांचे गर्लफ्रेंड गायिका ग्रिम्सशी ब्रेकअप झाले होते. दुसरीकडे सर्गेई आणि शॅनाहॅनमध्ये तणाव असूनही ते एकत्रच राहतच होते. मस्क आणि शॅनाहॅन यांच्यातील संबंधांबाबत माहीत होताच सर्गेई यांनी जानेवारीत कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
या वृत्तानंतर मस्क यांनी सोशल मीडियावर हे सारे साफ खोटे असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले, ‘सर्गेई आणि मी मित्र आहोत. काल रात्रीच आम्ही दोघे एका पार्टीत एकत्र होतो. मी शॅनाहॅनला तीन वर्षात दोनदा भेटलो. तेव्हा इतर लोकही होते. ही काही रोमँटिक भेट नव्हती.’
दोघे आधी चांगले मित्र होते. मस्क नेहमीच सिलिकॉन व्हॅली येथील सर्गेई यांच्या घरी जात. २००८ मध्ये मंदीकाळात टेस्ला उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत असताना सर्गेई यांनी मस्क यांना ५ लाख डॉलरची मदत केली. २०१५ मध्ये मस्क यांनी त्यांना टेस्लाची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही भेट दिली होती.
मस्क (डावीकडे) २४० अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर सर्गेई (उजवीकडे) ९५ अब्ज डॉलरसह आठवे आहेत.
मस्क यांचे नाव अनेक वादांशी जोडले गेले. त्यांची कंपनी स्पेसएक्सच्या एका कर्मचाऱ्याने त्यांच्यावर अभद्रपणाचा आरोप केला होता. एक दुसरी कंपनी न्यूरालिंकच्या एक्झिक्युटिव्ह शिवॉन जिलिस यांना गतवर्षी जुळे झाले. त्यांच्या दहापैकी १ मुलाने त्यांच्याशी नाते तोडले आहे. एक गर्लफ्रेंड ग्राइम्सशी त्यांचे नातेसंबंध सतत ताणलेले असतात.
मस्क यांना दहा मुले, खासगी जीवनासह व्यावसायिक वादातही अडकले.