Maharashtra Election: 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान, 23 तारखेला निकाल
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल. 23 ते 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारीसाठी अर्ज करता येणार आहे. 30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख असणार आहे. आजपासून 35 दिवसांनी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. नांदेडमध्ये पोटनिवडणूकीसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
महाराष्ट्रातील मतदानाविषयी महत्त्वाची माहिती
महाराष्ट्रात एकूण 9 कोटी 63 लाख मतदार आहेत. एकूण मतदार केंद्र 1 लाख 186 मतदान केंद्र आहेत. ग्रामीण भागातील 57 हजार 601 मतदान केंद्र आणि शहरी भागातील 42 हजार 562 मतदान केंद्र इतके आहेत. महाराष्ट्रात एकूण नवमतदारांची संख्या 18 लाख 67 हजार आहे. युवा मतादारांची संख्या 1 कोटी 85 लाख आहे. पुर्णपणे महिला संचलित बूथ असणार आहेत. सर्व बूथवर रांगेत बसायची सुविधा असणार आहे. तसेच बुथवर सर्व सुविधा असण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असणार आहे अशी माहिती यावेळी राजीव कुमार यांनी दिली आहे. व्होटर अॅपवर मतदार उमेदवारांची माहिती तपासू शकतात. 85 पेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी विशेष सोय करण्यात येणार आहे त्यांना घरातून मतदान करता येणार आहे.
राष्ट्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील निवडणुकीची तारिख जाहीर करण्यात आली. हरियाणा आणि जम्मू-कश्मिरच्या मतदारांचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आभार मानले आहेत. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत संपणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्याआधी नवं सरकार स्थापन होणार आहे.