औरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक

औरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक

आज महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज, 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतसाठी आज मतदान प्रकिया पार पडत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील होत असलेल्या 216 ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील गावात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर खुद्द पोलीस अधीक्षक आणि महत्वाचे अधिकारी निवडणूकीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी छावणीचे स्वरूप पाहायला मिळत आहे.

दरम्यान रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील बिडकीन ग्रामपंचायत आणि वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या वैजापूर मतदारसंघातील महालगाव ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत थेट सरपंचपदासाठी 1092,तर सदस्यपदासाठी 5481 अशा 6573 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांपैकी 371 जणांचे अर्ज छाननीत बाद ठरले. तर 1900 जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने सध्या सरपंचपदासाठी 611 तर सदस्यासाठी 3626 असे 4237 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com