'लाडक्या बहीण योजनेला कुणी टच केलं तर करेक्ट कार्यक्रम' एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा!

निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल.
Published by :
shweta walge

निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. याच पार्श्वभूमीवर आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहीण योजनेला कुणी टच केलं तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असं म्हणत विरोधकांवर थेट हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही आलो की सर्व योजना बंद करणार. जेलमध्ये टाकणार. पोलखोल करणार, असं विरोधक म्हणत आहेत. पण कोणाला जेलमध्ये टाकणार? योजना बंद करणार? तुमची पोलखोल झाली आहे. कोविडमध्येच तुमची पोलखोल झाली. काहीजण तर जेलमध्येही गेले. या सर्व योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, विरोधक आता खुलेआम बोलायला लागले आहेत. एवढी इर्ष्या? लोक विरोधात जातील. लाडकी बहीण योजनेला टच करायला गेलात तर त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. एकदम करेक्ट कार्यक्रम होणार. आमच्या लाडक्या बहिणी अजिबात ऐकून घेणार नाहीत. आम्ही ठरवलं आहे की लखपती बहिणी बनवणार. माझ्या बहिणींचं काय आहे ते बघा, माझं काय माझं काय बघून उद्योजक पळून गेले. म्हणून ठरवलं आहे सर्वसामान्य माणसाला काय देणार. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस येणार. म्हणून आम्ही काम करतोय”, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com