'माझी दाढी त्यांना खुपतंय, पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी' मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल
शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात पार पडत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. हिंदूहृदयसम्राट म्हणताना काही लोकांची जीभ कचरू लागली आहे. पण आपल्याला हा शब्द उच्चारायला अभिमान वाटतो. पण हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना लाज वाटत आहे अशी जहरी टीका त्यांनी केली.
ते म्हणाले की, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो ही गर्जना करून बाळासाहेब सुरुवात करायचे. तेव्हा माझ्यासकट सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. ही आठवण सर्वांना आहे. गर्व से कहो हम हिंदू है ही सिंह गर्जना बाळासाहेबांनी देशाला दिली. पण काही लोकांना या शब्दाची अलर्जी झाली आहे. हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटत आहे. हिंदूहृदयसम्राट म्हणताना काही लोकांची जीभ कचरू लागली आहे. पण आपल्याला हा शब्द उच्चारायला अभिमान वाटतो. पण हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना लाज वाटत आहे.
माविआ सरकार घालवून आपलं सरकार आलं तर सरकार टिकणार का? असा सवाल ते करत होते पण तुमचा एकनाथ शिंदे ठासून घासून राहिला. मला हालक्यात घेऊ नका, कट्टर शिवसैनिक आपले विचार आणि मैदान कधीही सोडत नाही. आज जिकडे एकनाथ शिंदे जातो तिकडे सगळे आशीर्वाद देतात. दोन वर्षात कमी काळात आपलं सरकार हे लाडकं सरकार झालं आहे. आपलं सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. अन्यायाला लाथ मारा असं बाळासाहेब म्हटले होते, अन्याय व्हायला लागला तेव्हा उठाव करायला लागला.
अनेक कामांना माविआ काळात ब्रेक लागला, इथं ब्रोकर नव्हता तर स्पीड ब्रेकर केले. आम्ही स्पीड ब्रेकर उखडून टाकली आणि नवीन सरकार आणलं. माझी दाढी खुपते त्यांना, पण होती दाढी म्हणून केली उध्वस्त मावीआची आघाडी, अशी कोटीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
गेल्या दोन वर्षात, कमी काळात हे सरकार लाडकं सरकार झालंय. लाडक्या बहिणींचे, भावांचे, शेतकऱ्यांचे लाडकं सरकार झालंय. अन्यायाला लाथ मारा अशी बाळासाहेबांची शिकवण. त्यामुळेच त्या विरोधात लढण्यासाठी आम्ही उठाव केला. हा उठाव केला नसता तर सच्च्या शिवसैनिकांचा अपमान झाला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्षे मागे गेला असता.
आपलं सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्र नंबर वन आणलं. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांपासून आपण शिवसेना मुक्त केली. त्यामुळे हा आझाद शिवसेनेची आझाद मेळावा आहे.
सत्तांतर झालं नसतं तर राज्य कितीतरी मागे गेलं असतं. मी कोविडला घाबरून घरात बसणारा मुख्यमंत्री नाही. त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात अनेक प्रकल्पांना ब्रेक लागले. जिथे नव्हता ब्रोकर, तिथे यांनी लावले स्पीड ब्रेकर. मग त्या सरकारला आम्ही उखडून टाकलं आणि नवीन सरकारला आणलं. माझी दाढी त्यांना खुपतंय. पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी, असं ते म्हणाले.