उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; एकनाथ शिंदेंना विधीमंडळ गटनेतेपदी मान्यता

उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; एकनाथ शिंदेंना विधीमंडळ गटनेतेपदी मान्यता

विधीमंडळ सचिवालयानं तसं पत्र एकनाथ शिंदेंना दिलं आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

शिवसेनेच्या विधीमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदेंना मान्यता मिळाली असून, उद्धव ठाकरे नियुक्त अजय चौधरी यांची शिवसेनेच्या गटनेतेपदाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यामुळे आता उद्घव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. विधीमंडळ सचिवालयानं तसं पत्र एकनाथ शिंदेंना दिलं आहे. तसंच शिवससेनेचे मुख्य पक्षप्रतोदपदी असलेल्या सुनील प्रभू यांचीही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचा दुसरा मोठा विजय झाला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे राजन साळवी यांचा पराभव केला. आकड्यांच्या खेळात भाजप आणि शिंदे गट आधीच मजबूत असला तरी या विजयाचा अर्थ वेगळा आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गटाच्या अडचणीत झपाट्याने वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com