Eknath Shinde: Aurangabad : ठाकरेंना धक्का; शिंदेंकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मिळाली स्थगिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नावाची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर अनेक धक्के महाविकास आघाडीला बसत आहेत. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता शिंदे सरकारने ठाकरेंनी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे.
औरंगाबाद (Aurangabad)महापालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांची बदली करण्यात आली होती. सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची औरंगाबादच्या महापालिका आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली होती. तर पांडे यांना औरंगाबाद सिडकोचे मुख्य प्रशासकपद देण्यात आले होते. तसेच दिपा मुधोळ मुंडे यांना सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नियुक्त केले होते.
मात्र आता ठाकरेंनी (Uddhvh Thackeray) केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून स्थगिती देण्यात आली आहे. २९ जूनला ठाकरे सरकारने अखेरची कॅबिनेट बैठक घेतली होती. त्यामध्ये तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.