ED | Xiaomi
ED | XiaomiTeam Lokshahi

ED Action On Xiaomi: ईडीचा शाओमीला खूप मोठा दणका! 5 हजार 551 कोटींचा निधी गोठवणार

परकीय चलन व्यवस्थापन कायदाचं उल्लंघन
Published by :
Sagar Pradhan
Published on

देशात ईडीकडून सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. चीनची मोबाईल उत्पादन करणारी कंपनी शाओमीचा 5 हजार 551 कोटींचा निधी आता ईडीकडून गोठवण्यात येणार आहे. परकीय चलन विनिमय कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसूली संचालनालयानं कंपनीविरुद्ध तपास केला होता. यानंतर कंपनीचा 5 हजार 551 कोटी रुपयांचा निधी जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडीची देशातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी जप्तीची कारवाई आहे.

ED | Xiaomi
युवासेना करणार शिंदेगटाची कोंडी! मुंबई विद्यापीठाची जागा शिंदेगटाला पार्किंगसाठी देण्यास विरोध

परकीय चलन व्यवस्थापन कायदाचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली चीनी मोबाईल निर्माता शाओमीचे 5,551 कोटी रुपये जप्त करण्याच्या ईडीच्या निर्णयाला फेमा प्राधिकरणानं मान्यता दिली आहे. यापूर्वी, कर्नाटक उच्च न्यायालयानं ईडीच्या कारवाईविरुद्ध शाओमीचे अपील फेटाळले होते. शाओमी भारतात एमआय नावानं मोबाईल विकते.

शाओमी कंपनीने 2014 मध्ये भारतीय मोबाईल मार्केटमध्ये प्रवेश केला. कंपनीने दुसऱ्याच वर्षापासून रॉयल्टीच्या नावाखाली कोट्यवधी रूपये परदेशात पाठवण्यास सुरुवात केली. मुळ चीनी कंपनी असणाऱ्या शाओमी कंपनीने दोन अमेरिकी कंपन्यांनाही रॉयल्टी पाठवली जात होती. या अमेरिकेतील कंपन्यांचा शाओमीच्या भारतातील कामकाजाशी काहीही संबंध नव्हता. हजारो कोटी रुपये परदेशात पाठवणं हे फेमाचे उल्लंघन असल्याचं ईडीने म्हटले आहे.

ED | Xiaomi
चाफा बोलेना, चाफा उगवेना, असा चाफा फक्त मातोश्रीतच; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

FEMA उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीला तीनपटींहून अधिक रकमेचा दंड आकारण्यात येणार आहे. शाओमी कंपनीचे 5,551 कोटी रुपये जप्त करण्याच्या ईडीच्या निर्णयाला फेमाने मान्यता दिली आहे. यापूर्वी, कर्नाटक उच्च न्यायालयानं ED च्या कारवाईविरुद्ध शाओमीची अपील फेटाळली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com