Patra Chawl Scam : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने आणखी एक समन्स पाठवला आहे. पत्रा चाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत असताना संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील मनी लॉंड्रींग प्रकरणात (money laundering cases) समन्स पाठवण्यात आले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने आणखी एक समन्स पाठवला आहे. पत्रा चाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत असताना संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील मनी लॉंड्रींग प्रकरणात (money laundering cases) समन्स पाठवण्यात आले आहे.

वर्षा राऊत यांना चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी करण्यात आली होती.

पत्रा चाळ प्रकरणात आज संजय राऊत यांना आठ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यादरम्यान पत्रा चाळ जमीन प्रकरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने आज समन्स बजावला आहे. वर्षा राऊत यांच्या खात्यावर काही व्यवहार उघडकीस आल्यानंतर ईडीने त्यांच्या नावे समन्स जारी केले आहे.

Patra Chawl Scam : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
Sanjay Raut | वर्षा राऊत यांना ईडीचे समन्स
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com