Bhavana Gawali
Bhavana GawaliTeam lokshahi

Bhavana Gawali यांना पुन्हा एकदा 'ईडी'कडून समन्स

यापूर्वी ईडीने भावना गवळी यांना तीन समन्स पाठवली होती
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून समन्स धाडण्यात आले आहे. याअंतर्गत 'ईडी'ने (ED) सप्टेंबर महिन्यात गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. या प्रकरणात ईडीने सईद खान या व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान, आज (29 एप्रिल ) खासदार भावना गवळी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. त्यानुसार भावना गवळी यांना पुढील आठवड्यात ईडीच्या (ED) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यापूर्वी ईडीने भावना गवळी यांना तीन समन्स पाठवली होती. मात्र, भावना गवळी एकदाही ईडीच्या चौकशीला उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यामुळे आता ईडीने भावना गवळी यांच्याविरोधात कठोर पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

Bhavana Gawali
धक्कादायक ! पोलिसांच्या धाडीत ग्राहकाचा मृत्यु

'ईडी'ने सप्टेंबर महिन्यात गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर या प्रकरणात सईद खान या व्यक्तीला अटक केली होती. सईद खान यांच्या चौकशीत बाहेर आलेल्या माहितीच्या आधारे गवळी यांना याआधी ४ ऑक्टोबरला समन्स बजावले होते. त्यानंतर १५ दिवसांनी त्यांना पुन्हा 'ईडी'ने समन्स बजावले होते. पण चिकनगुनिया झाल्याचे सांगत त्यावेळीसुद्धा भावना गवळी चौकशीला अनुपस्थित राहिल्या होत्या. त्यानंतर बजावण्यात आलेल्या तिसऱ्या समन्सनंतरही भावना गवळी चौकशीसाठी हजर झाल्या नव्हत्या.

काय आहे प्रकरण?

खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा 'ईडी'ला संशय आहे. याअंतर्गत 'ईडी'ने सप्टेंबर महिन्यात गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर 'ईडी'ने या प्रकरणात सईद खान या व्यक्तीला अटक केली आहे. 'ईडी'तील सूत्रांनी सांगितले, 'गवळी यांच्या ट्रस्टमध्ये सईद खान हे संचालक आहेत. या ट्रस्टला बेकायदेशीररित्या कंपनीमध्ये रुपांतरित करण्यासाठी सईद खान यांनी मध्यस्थी केली. त्यासाठीच धर्मदाय आयुक्त कार्यालयातदेखील गैरव्यवहार झाला. एकूण घोटाळा १८ कोटी रुपयांचा आहे. शिवाय सात कोटी रुपयांच्या रोख रकमेचादेखील गैरवापर करण्यात आला, अशी माहिती ईडीला मिळाली आहे. त्यासंबंधी अधिक चौकशीसाठीच गवळी यांना तीनवेळा समन्स बजावण्यात आले होते.

आपल्या स्वीय सहाय्यकाने संस्थेत कोट्यवधींचा अपहार केला आहे, अशी पोलिस तक्रार भावना गवळी यांनीच २०२० मध्ये केली होती. त्या आधारावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गवळी यांना लक्ष्य केले होते. गवळी यांच्याकडे इतके पैसे आले कुठून, असा प्रश्न उपस्थित करत सोमय्या यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली आणि गवळी व सईद यांच्याविरोधातच गुन्हा नोंदवला होता.

सईद हा भावना गवळी यांच्याशी संबंधित महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये संचालक आहे. पूर्वी विश्वस्त संस्था असलेली ही संस्था नंतर कंपनीत रूपांतरित करण्यात आली आणि त्यावर भावना गवळी यांच्या आई शालिनी व सईद यांना संचालक बनवण्यात आले. कंपनी निबंधकांकडे बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली आणि या कंपनीच्या माध्यमातून पैशांचा अपहार करण्यात आला, असा ईडीचा आरोप आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com