Praful Patel | ईडीच्या रडारवर आता राष्ट्रवादी; प्रफुल पटेल यांच्यावर मोठी कारवाई

Praful Patel | ईडीच्या रडारवर आता राष्ट्रवादी; प्रफुल पटेल यांच्यावर मोठी कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे अत्यंत जवळचे नेते प्रफुल पटेल यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

ईडी (ED) आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवली असून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. दरम्यान प्रफुल पटेल (Praful Patel) यांचं मुंबईतलं घर ईडीने जप्त केलं आहे. इक्बाल मिर्चीच्या कुटुंबासोबत आर्थिक व्यवहार केला होता. जे काही झालं ते कायदेशीर झालं असं पटेल यांनी म्हटलं होतं. मात्र आता ईडीने त्यांच्यावर कारवाई करत त्यांचं मुंबईतल्या वरळी भागात असेललं घर जप्त केलं आहे.

Praful Patel | ईडीच्या रडारवर आता राष्ट्रवादी; प्रफुल पटेल यांच्यावर मोठी कारवाई
Kalyan Shivsainik Attack| हर्षवर्धन पालांडे हल्ला प्रकरणाची कसून चौकशी करा; शिंदे गटाची पोलिस उपायुक्तांकडे मागणी

इक्बाल मिर्ची प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे. प्रफुल पटेल यांची २०१९ मध्ये चौकशीही झाली होती. इक्बाल मिर्ची संदर्भातले हे आरोप होते. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर आपलं म्हणणं मांडलं होतं. आता याच प्रकरणात ईडीने चार मजले म्हणजेच प्रफुल पटेल यांचं घर जप्त केलं आहे.

Praful Patel | ईडीच्या रडारवर आता राष्ट्रवादी; प्रफुल पटेल यांच्यावर मोठी कारवाई
Ganeshotsav 2022 : गणेश मूर्तीवरील उंचीची मर्यादा हटवली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

नेमक प्रकरण काय?

वरळी येथे सीजे हाऊस (CJ House) इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामाआधी त्या जागेवर एक छोटीशी इमारत होती. ही इमारत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. या कंपनीची पुनर्बांधणी प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केली होती. त्या मोबदल्यात प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांना काही जागा आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दिली होती. या व्यवहारात गैरप्रकार झालाचा संशय ईडीला आहे. त्यामुळे पैशांची अफरातफर झाल्याचा बोट ठेवून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com