Sanjay Raut : संजय राऊत हाजीर हो..., आज ईडी चौकशी

Sanjay Raut : संजय राऊत हाजीर हो..., आज ईडी चौकशी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज, २७ जुलैला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीचे समन्स बजावले आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना आज, २७ जुलैला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीचे समन्स बजावले आहे. अलिबाग येथील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. राऊत यांना सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.

Sanjay Raut : संजय राऊत हाजीर हो..., आज ईडी चौकशी
बँकांची कामे आताच उरका, सणांमुळे ऑगस्ट महिन्यांत सुट्याच, सुट्या

उद्योजक सुजित पाटकर (Sujit Patkar ) व त्यांच्या पत्नी स्वप्ना, यांची ईडीने मनी लॉन्डरिंगप्रकरणी (case of money laundering) चौकशी केली होती. त्या चौकशीतील माहितीच्या आधारे ईडीने संजय राऊत यांना समन्स बजावले होते. त्यावेळी राऊत यांनी ७ ऑगस्टपर्यंतचा कालावधी मागितला होता. परंतु ईडीने त्यांना २७ जुलैपर्यंत चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार ते बुधवारी ईडीच्या बॅलर्ड पिअर भागातील क्षेत्रीय संचालनालयात चौकशीसाठी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मात्र सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने राऊत चौकशीसाठी बुधवारी उपस्थित राहणार की गेल्या वेळेप्रमाणेच वकिलांमार्फत मुदतवाढीचा अर्ज करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, ईडीने कितीही चौकशी केली तरी आपण पक्ष सोडणार नसल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी दिल्लीत मंगळवारी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com