Farooq Abdullah यांच्या विरुद्ध मनी लॉड्रींग प्रकरणात चार्जशीट दाखल
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रींग प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते सक्तवसुली संचालनालयाच्या रडारवर होते. जम्मू काश्मीर क्रिकेट असोशिएशनमध्ये पैशांचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप असून, ईडीकडून या प्रकरणाची मागच्या अनेक महिन्यांपासून चौकशी केली जात होती.
जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या (JKCA) निधीच्या घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी 84 वर्षीय फारुख अब्दुल्ला यांची ईडीने 31 मे रोजी श्रीनगरमध्ये तीन तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली होती. फारुख अब्दुल्ला यांच्यासह अहसान अहमद मिर्झा, मीर मंजूर गझनफर आणि इतरांची नावेही आरोपपत्रात आहेत. पीएमएलए कोर्टाने सर्व आरोपींना पीएमएलएच्या विशेष कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.