Economist Bibek Debroy passed away: ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन

Economist Bibek Debroy passed away: ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष बिबेक देबरॉय यांचे निधन. त्यांच्या आर्थिक धोरणांच्या योगदानामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका.
Published by :
shweta walge
Published on

देशातील सुप्रसिद्ध अर्थतज्ञ आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष बिबेक देबरॉय यांचे निधन झाले. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बिबेक देबरॉय यांनी देशाची आर्थिक धोरणे तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

बिबेक देबरॉय यांनी गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलपतीपदाचा सप्टेंबरमध्ये राजीनामा दिला होता. संस्थेच्या कुलगुरू पदावरून अजित रानडे यांच्या हकालपट्टीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर देबरॉय यांनी कुलपतीपदाचा राजीनामा दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देबरॉय यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले की,‘देबरॉय हे ज्ञानी असं व्यक्तिमत्व होते. ते अर्थशास्त्र, इतिहास, संस्कृती, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये पारंगत होते. आपल्या कामातून त्यांनी भारताच्या बौद्धिक भूभागावर अमिट छाप सोडली. याव्यतिरिक्त ऐतिहासिक दस्तावेज तरुणांपर्यंत कसे पोहोचतील यासाठीही त्यांनी अविरत काम केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com