दिल्ली-एनसीआर ते जम्मू-काश्मीरपर्यंत भूकंपाचे तीव्र धक्के, पाकिस्तानमध्येही प्रभाव

दिल्ली-एनसीआर ते जम्मू-काश्मीरपर्यंत भूकंपाचे तीव्र धक्के, पाकिस्तानमध्येही प्रभाव

भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले
Published on

नवी दिल्ली : भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआर, जम्मू काश्मीर, चंदीगडसह भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचा प्रभाव जाणवला आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 मोजण्यात आली आहे. पहाटे 1.33 वाजता हा भूकंप झाला.

माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे होता. हा केंद्रबिंदू जमिनीच्या आत 6 किलोमीटर होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.4 इतकी होती. याचे धक्के दिल्ली-एनसीआर, जम्मू काश्मीर, चंदीगडसह भारतातील अनेक शहरांमध्ये जाणवले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com