ताज्या बातम्या
इंडोनेशियात भूकंपाचे धक्के, २० जण ठार तर ३०० जखमी
इंडोनेशियाच्या जावा बेटावर उथळ 5.6-रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
इंडोनेशियामधून आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. इंडोनेशियाच्या जावा बेटावर सोमवारी ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने किमान २० जण ठार तर ३०० जखमी झाले. भूकंपाचे केंद्र पश्चिम जावा शहराजवळ सियांजूर होते. इंडोनेशियाच्या जावा बेटावर उथळ 5.6-रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. भूकंपाने राजधानी जकार्तापर्यंतच्या उंच इमारतींना हादरा दिला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
"मला आत्तापर्यंत मिळालेली माहिती, एकट्या या हॉस्पिटलमध्ये जवळपास 20 जणांचा मृत्यू झाला आणि किमान 300 लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी बहुतेकांना इमारतींच्या अवशेषांमुळे फ्रॅक्चर झाले होते," असे सियांजूरचे प्रशासन प्रमुख हर्मन सुहर्मन यांनी सांगितले.