Droupadi Murmu swearing : द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली, मान्यवरांची उपस्थिती
President Oath Ceremony : भारताच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी आज (सोमवारी, ता. २५) संसदेच्या मध्यवर्ती कक्षात (सेंट्रल हॉल) मध्ये मान्यवरांच्या उपस्थिती राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. नव्या राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे. यानंतर राष्ट्रपतींचे अभिभाषणही होईल. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आपले प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकानं पराभव करत मुर्मू यांनी संपादन केला आहे. द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या राष्ट्रपती पदी विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर 25 जुलैला अनेक राष्ट्रपतींनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे. अशा परिस्थितीत भारताच्या इतिहासात 25 जुलै ही तारीख राष्ट्रपतींच्या शपथविधीसाठीही ओळखली जाते.
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची शपथ घेतली. दिल्लीतील संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये मुर्मू यांचा शपथविधी सोहळा पार पडला. मुर्मू यांना सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. सकाळी सव्वादहा वाजता संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात शपथविधी समारंभ होणार पार पडला. देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे मुर्मू यांना राष्ट्रपतिपदाची शपथ दिली.
या शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्री परिषदेचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि प्रमुख नागरी आणि लष्करी अधिकारी, सरकारी विभागांतील अधिकारी उपस्थित होते. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात समारंभाच्या समारोपानंतर, मुर्मू राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील. तेथे त्यांना आंतर-सेवा गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात येईल.