Dr. Prachi Rathod|Dr. Ruth John Paul
Dr. Prachi Rathod|Dr. Ruth John PaulTeam Lokshahi

पहिल्यांदाच सरकारी रुग्णालयात दोन ट्रान्सजेंडर डॉक्टर सेवेत रुजू, घडवला नवा इतिहास

हा सगळा प्रवास नरकापेक्षा कमी नव्हता. आत्मविश्वासाच्या जोरावरच मी समाजाची सेवा करत आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

डॉ. प्राची राठोड आणि डॉ. रुथ जॉन पॉल या तेलंगणातील सरकारी सेवेत रुजू होणाऱ्या पहिल्या दोन ट्रान्सजेंडर डॉक्टर ठरल्या आहेत. उस्मानिया येथील सामान्य रुग्णालयात रुजू होणाऱ्या पहिल्या ट्रान्सजेंडर वैद्यकीय अधिकारी आहेत. याबद्दलची माहिती ‘एएनआय’ या वृत्त संस्थेनं दिलीय.

त्यातल्या एका ट्रान्सजेंडर वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. प्राची राठोड यांनी सांगितले की, असंख्य ट्रान्सजेंडर व्यक्तीसारखेच माझ्या आयुष्यातदेखील चढ-उतार आले. लहानपणी, त्यानंतर एमबीबीएसला कॉलेजमध्ये असताना आणि इमर्जन्सी फिजिशियन म्हणून काम करताना मला भेदभावाचा सामना करावा लागला. हा सगळा प्रवास नरकापेक्षा कमी नव्हता. आत्मविश्वासाच्या जोरावरच मी समाजाची सेवा करत आहे. असे त्या यावेळी म्हणाल्या.

मला लहानपणापासूनच संघर्ष करावा लागला- डॉ. रुथ जॉन पॉल

“मी ट्रान्सजेंडर असल्याने मला लहानपणापासूनच संघर्ष करावा लागला. डॉक्टर होण्याच्या स्वप्नाने मला अधिक कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा दिली. मला नातेवाईक, समाज आणि मित्रांकडून अपमानही सहन करावा लागला. मात्र, तरीही दृढ निश्चय करत मी माझं शिक्षण पूर्ण केलं”, अशा शब्दात डॉ. पॉल यांनीही त्यांच्या संघर्षाबद्दल माहिती दिली.खडतर प्रवासात पाठिंबा देणारे रुग्णालयाचे अधीक्षक आणि सर्व प्राध्यापकांचे पॉल यांनी आभार मानले.

तृतीयपंथींनी भीकच मागत राहायचं का?

अफवांकडें दुर्लक्ष करत माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रीत केलं. माझ्या समाजातील लोकांनी मला यासाठी प्रोत्साहन दिलं. उस्मानियामध्ये प्रवेश घेण्यासाठीही त्यांनी मदत केली. मी लहान असताना वडिलांचे निधन झाले. भावाने शिक्षणासाठी खूप मदत केली. ट्रान्सजेंडर लोकांसाठी असलेल्या एक सेवाभावी संस्थेच्या क्लिनिकमध्ये मी काही काळ डॉक्टर म्हणून काम केलं. त्यानंतर माझी उस्मानिया रुग्णालयासाठी निवड झाली”, अशी माहिती पॉल यांनी दिलीय.

उस्मानिया सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नागेंद्र यांनी ट्रान्सजेंडर समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. “उस्मानिया रुग्णालयात ट्रान्सजेंडर क्लिनिक स्थापन करण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागांसाठी ३६ डॉक्टरांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी आम्ही तीन ट्रान्सजेंडर डॉक्टरांची नियुक्ती केली. यामध्ये दोन ट्रान्सवुमेन तर एका एचआयव्ही ग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे”, अशी माहिती डॉ. नागेंद्र यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com