भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या डॉ. पल्लवी सापळे पुणे अपघात प्रकरणातील SITच्या अध्यक्ष

भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या डॉ. पल्लवी सापळे पुणे अपघात प्रकरणातील SITच्या अध्यक्ष

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या डॉ. पल्लवी सापळे पुण्यातील अपघात प्रकरणातील घटनेची चौकशी करणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या डॉ. पल्लवी सापळे पुण्यातील अपघात प्रकरणातील घटनेची चौकशी करणार आहेत. हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सँपलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. पल्लवी सापळे या समितीच्या अध्यक्षा आहेत. डॉ.पल्लवी सापळे यांच्यावर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि जेजे रुग्णालयात असताना अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आले आहेत.

आता डॉ.पल्लवी सापळे ससून रुग्णालयातील डॉ.अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळणोर यांनी केलेल्या ब्लड सँपलमध्ये फेरफार प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com