डोंबिवली रेल्वे पादचारी पूल झगमगला तिरंगा रोषणाईने
कल्याण (अमजद खान) - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त डोंबिवली रेल्वे पादचारी पूलाला तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे पूल 15 ऑगस्टच्या पूर्वीच रोषणाईने झगमगून निघाला आहे. ही रोषणाई नागरीकांच्या डोळ्य़ांचे पारणे फेडत आहे. (Dombivli Railway Pedestrian Bridge lit up with Shiv Sena lights)
या रोषणाईकरीता शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे. माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे मागणी केली होती की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय, महापालिकेच्या अन्य इमारती, पत्री पूल आणि रेल्वे पादचारी पूलावर तिरंगा रोषणाई करा. त्यानुसार आयुक्तांनी ठिकठिकाणी तिरंगा रोषणाई केली आहे. डोंबिवली रेल्वे पादचारी पूलाची तिरंगाई रोषणाई आज सायंकाळपासून सुरु करण्यात आली आहे. या रोषणाईने झगमगून गेलेला पूलाची पाहणी स्वत: म्हात्रे यांनी केली.